विठ्ठलदास आसावा यांचे कृषी क्षेत्रातील कार्य दिशादर्शक- थोरात



संगमनेर (प्रतिनिधी)-येथील
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५वर्षाच्या गाळप हंगाम बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी युनायटेड स्टेट अमेरीकन मेरीट कौन्सिलची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल कारखाना सभासद कृषीभूषण विठ्ठलदास बालकिसन आसावा यांना सौ.कांचन व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि डाॅ. सुधीर तांबे  जिल्हा बँक उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

 आंतरराष्ट्रीय संस्थेने श्री. असावा यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्ल आमदार थोरात यांनी प्रसंगी गौरवोद्गार काढले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ,उपाध्यक्ष संतोष हासे,अनिल पाटोळे, विठ्ठल खेमनर,सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक जे.बी.घुगरकर आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे