भारतीय सैन्य दलात वीस वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यानंतर घरी आलेल्या विद्यार्थ्यांचा त्याच्या तत्कालीन शिक्षकांकडून सत्कार!

शिर्डी (प्रतिनिधी )राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथिल  भारतीय सैन्य दलात वीस वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होऊन गावी परतलेल्या मेजर किरण बबनराव जपे यांचा  त्याचे तत्कालीन शिक्षक यांच्याकडून सत्कार करत त्याचे अभिनंदन केले.
किरण बबनराव जपे हा राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. किरण शाळेत हुशार होता. भारतीय सैन्य दलात जाण्याची लहानपणाची जिद्द होती.वीस वर्षांपूर्वी तो भारतीय सैन्य दलात दाखल झाला. तेथे आयटीआय केला. भटिंडा लेह, लडाख, जम्मू अआदी ठिकाणी देश सेवा केली. व वीस वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर मेजर किरण सेवानिवृत्त झाला असून तो दीपावलीच्या शुभ दिनीच सेवानिवृत्त होऊन घरी परतला. त्याचा सावळीविहिर ग्रामस्थांनी येथोचित सत्कार केला. सन्मान केला. तसेच आपला विद्यार्थी वीस वर्षे देश सेवा करून घरी, गावी परतल्याची समजताच त्या वेळचे त्याचे शिक्षक ,राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर, भागवत सर, लोखंडे सर, यांनी आवर्जून सावळीविहीरला येत  माजी उपसरपंच गणेश कापसे, रावसाहेब आगलावे,  यांना घेऊन व त्याच्या घरी जाऊन पुरुषोत्तम पगारे सर, भागवत सर, लोहकणे सर ,यांनी मेजर किरण जपे तसेच त्याला देश सेवेसाठी प्रेरणा देणारे त्याचे आई- व वडील बबनराव जपे यांचाही  या शिक्षकांनी सत्कार केला. तसेच किरणला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. किरणने देश सेवेसाठी इतरांनाही प्रेरणा द्यावी .त्यासाठी प्रयत्न करावे .असे पुरुषोत्तम पगारे सर यांनी यावेळी किरणला शुभेच्छा देताना सांगितले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे