*संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या शहरपदी संतोष उर्फ सोनू गायकवाड यांची नियुक्ती...*



संगमनेर( प्रतिनिधी) काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय विश्वासू समजले जाणारे तसेच शहरातील नावाजलेले व्यक्तिमत्व संतोष उर्फ सोनू  गायकवाड यांची नुकतीच संगमनेर शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी श्री.गायकवाड यांना त्यांच्या निवडीचे पत्र आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांचेसह तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते प्रसंगी सत्काराला उत्तर देताना न्यूतन शहराध्यक्ष श्री. गायकवाड म्हणाले की समाजातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकापर्यंत काँग्रेसची विचारधारा पोहोचविण्यासाठी मी बांधील आहे मी आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे,डॉ.सुधीर तांबे, संगमनेर युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, जिल्हा प्रभारी प्रियंका रणपिसे,काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांचे ऋण व्यक्त करतो.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे