संगमनेर ( प्रतिनिधी) तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथील शिदोंडी ते वरवंडी ह्या घाट रस्त्याचे काम तीन चार वर्षांपासून प्रलंबित आहे.सुरवातीला केलेले सर्व खडीकरण उखडून हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे चालतांना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा समजला जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे त्यात ठेकेदाराचा चालढकलपणा अनेक शंका निर्माण करणारा ठरतोय हा रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास २५ मार्च रोजी रिपाइं आणि ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) संगमनेर तालुका मराठा आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम वर्पे यांनी नुकतेच संगमनेरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून या रस्त्याबाबत अडचणीचा पाढा शासन दरबारी मांडला आहे वरवंडी ते शिंदोडी घाट रस्ता २५१५ या योजनेतून मंजूर आहे मात्र हे काम केवळ ठेकेदाराच्या चालढकलपणा मुळे प्रलंबित आहे.
निवेदनात गौतम वर्पे यांनी म्हटले आहे की २०२० मध्ये या रस्त्याचे काम ठेकेदाराने चालू केले व खडी टाकून कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली परंतु मागील १३ १४ महिन्यांपासून हे काम पूर्णपणे बंद आहे.या रस्त्याचे काम त्वरित चालू करावे तसेच आज रस्त्याची झालेली दुरावस्था अतिशय चिंताजनक आहे जे काम आधी केले होते ते देखील अतिशय निकृष्ट दर्जाचे होते आता तर पूर्ण खडी ठिकठिकाणी गोळा झालेली असुन रस्त्यात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे सदर ठेकेदाराला दोषी ठरवून त्याच्यावर देखील कारवाई करावी.अन्यथा २५ मार्च रोजी वरवंडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा गौतम वर्पे यांनी दिला आहे
निवेदनावर संगमनेर पठार भागाचे विभाग प्रमुख सागर शिंदे संगमनेर युवा विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भोसले वरवंडी शाखेचे शाखाध्यक्ष भरत भोसले प्रदीप भोसले, शिंदोडीचे सामाजिक कार्यकर्ते रबाजी कुदनर यांच्या सह्या आहेत.
0 Comments