शिर्डी (प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील निघोज येथे श्री गुरुदेव दत्त मंदिर व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निघोज ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.मंगळवार दिनांक २२ ते शुक्रवार दिनांक २५ ऑक्टबरपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने भव्य त्रिदिनात्मक अखंड हरिनाम कीर्तन मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महामंडलेश्वर काशिकानंद महाराज, खान्देश रत्न हभप तुकाराम महाराज जेऊरकर,हभप देविदास महाराज म्हस्के यांची किर्तन सेवा होणार असून हभप मीराबाई मिरिकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.या दरम्यान सकाळी पहाटे काकडा भजन, मूर्ती प्राण प्रतिष्ठा विधी, सायंकाळी हरिपाठ आणि हरिकिर्तन होणार आहे. सोमवारी २१ तारखेला मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा शोभा यात्रा निघणार आहे.२५ ऑक्टोबर रोजी हभप भास्करगिरीजी महाराज यांचे हस्ते मूर्तीचे अनावरण होणार आहे.या सोहळ्यास परिसरातील सोहळ्यास साधू संत उपस्थित राहणार असून ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन निघोज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments