महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या असून प्रचार शिगेला पोहोचला आहे . आठवडे बाजारतही प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचाराने सर्वत्र आघाडी घेतली आहे .सर्व पक्ष, उमेदवार, अपक्ष उमेदवार त्यांचे कार्यकर्ते यांचे ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. स्पीकर लावून गाड्या फिरत आहेत .गावागावात कार्यकर्ते आप आपल्या उमेदवारांसाठी प्रचार फेऱ्याकाढून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. पत्रके देत आहेत. कॉर्नर सभा ,बैठका होत आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या नेत्यांच्या सभाही होत आहेत. प्रचाराने ऐन थंडीमध्ये तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. आठवडे बाजारातही आता विक्रीते ते ग्राहक ,बाजारकरू दुकानदार यांच्याशी गाठीभेटी घेऊन प्रचार केला जात आहे. गुरुवारी राहाता व सावळीविहिर येथे आठवडे बाजार होता .येथेही वेगवेगळे उमेदवार ,कार्यकर्ते प्रचार करताना दिसून येत होते. त्याचप्रमाणे रविवारी निमगाव येथील बाजारात तर मंगळवारी शिर्डी येथील बाजारात व बुधवारी लोणी येथील बाजारातही पत्रके वाटून कार्यकर्त्यांकडून प्रचार करण्यात येत असल्याचे दिसत होते. सध्या प्रचार हा शिगेला पोहोचला आहे. उमेदवार ,कार्यकर्ते अहोरात्र प्रचारात मग्न असल्याचे दिसून येत आहेत. एकूणच सर्वत्र राजकीय वातावरण , राजकीय चर्चा, याला उधाण आले आहे.
0 Comments