श्री साई मंदिरात हार फुले नेण्यास मिळाली परवानगी! शिर्डीत ग्रामस्थ साईभक्त ,दुकानदारांमध्ये आनंद! आता फुल बागाही फुलणार!

शिर्डी,( प्रतिनिधी)
शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिरात कोरोना काळापासून सुरक्षेच्या कारणास्तव हार,फुलांना बंदी करण्यात आली होती. ती आता उठवण्यात आली असून हार फुल चालू करण्यात आले आहेत .त्यामुळे साईभक्त शेतकरी, ग्रामस्थ ,दुकानदार ,फुल उत्पादक यांच्या मधून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.
शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साई बाबा मंदिरातील फुलांची बंदी उठविल्याबद्दल महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी गुरुवारी आभार मानले.
यावेळी समस्त समर्थकांनी, शेतकरी व फूल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. तसेच नामदार विखे साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉ. सुजय दादांसारखे तरुण, तडफदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो, असे वक्तव्य फूल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी केले. हार फुल चालू केल्यामुळे शिर्डी मध्ये आर्थिक उलाढाल ही वाढणार आहे.
सन २०२३ मध्‍ये  साईबाबा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थापन समितीकडून दाखल करण्‍यात आलेल्‍या ठरावा नुसार तसेच तालुक्‍यातील फुल उत्‍पादक शेतक-यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर झालेल्‍या सुनावणी नंतर श्री.साई मंदिर व परिसरात फुले  विक्रीस उच्‍च न्‍यायालयाने आज गुरुवारी परवानगी दिल्‍याने फुल उत्‍पादक शेतकरी आणि विक्रेत्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍याचे मोठे यश मानले जात आहे.
 कोव्‍हीड संकटापासून साई मंदिरात फुले नेण्‍यास बंदी घालण्‍यात आली होती. त्‍यामुळे फुल आणि हार विक्रेत्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहेत. यासाठी शासन स्‍तरावरही मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्‍या  माध्‍यमातून या प्रश्नाचा  पाठपुरावा सुरु होता.साई  संस्‍थानवर कार्यरत असलेल्‍या त्रिसदस्यीय समितीकडे याबाबतची मागणी करण्‍यात येत होती. मात्र निर्णय होत नसल्‍यामुळे फुल उत्‍पादक शेतकरी अनुक्रमे कचेश्‍वर चौधरी, अर्जुनराव चौधरी, संदिप गोर्डे यांनी न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. तर साईबाबा संस्‍थानच्‍या त्रिसदस्‍यीय समितीने दिनांक  १३ एप्रिल २०२३ रोजी ठराव करुन, कर्मचारी पतपेढीच्‍या माध्‍यमातून रास्‍त दरात फुल विक्री करण्‍याची परवानगी मिळावी असे म्‍हणणे न्‍यायालयात मांडले होते.
 यापुर्वीही या प्रकरणाची सुनावणी उच्‍च तसेच सर्वौच्‍च न्‍यायालयात झालेली होती. फुल उत्‍पादक शेतकरी तसेच फुल उत्‍पादक तसेच विक्रेत्‍यांच्‍या  मागणीची सामाजिक दृष्‍टीकोनातून विचार होण्‍यासाठी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सर्वच स्‍तरांवर आपला पाठपुरावा सुरुच ठेवला होता. आज गुरुवारी संभाजीनगर येथील उच्‍च न्‍यायालयात या प्रकरणाची सुनावणी होवून न्‍यायालयाने श्री.साईबाबा मंदिर व परिसरामध्‍ये फुले विक्रीस परवानगी देण्‍याचा निर्णय दिल्‍यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
या सुनावणी प्रसंगी फुल उत्‍पादक शेतक-यांच्‍या वतीने जेष्‍ठ विधीज्ञ विनायकराव होन, संस्‍थानच्‍या वतीने विधीज्ञ बजाज आणि शासनाच्‍या  वतीने विधीज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली.दरम्यान या झालेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी अभिनंदन करून जल्लोष केला.शिर्डी शहरात फटाक्यांची अतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले.फुल विक्रेत्यांनी मंत्री विखे यांचे शिर्डी विमानतळावर जल्लोषात स्वागत करून त्यांचे आभार मानले.
मंदिर आणि परिसरात फुल विक्री बाबत उच्‍च न्‍यायालयाने निर्णयाचे आपण स्‍वागत करीत असून, या निर्णयामुळे तालुक्‍यातील फुल उत्‍पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार असून मागील काही वर्षात फुल उत्‍पादक शेतक-याचे झालेल्‍या आर्थिक नकसानीचे गांभिर्य न्‍यायालयाच्‍या  निदर्शनास आणून दिले होते. यासाठी करण्‍यात आलेल्‍या पाठपुराव्‍याला यश मिळाले असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले. या निर्णयामुळे शिर्डीत आर्थिक उलाढाल वाढणार आहेच ,व  मोडकळीच आलेल्या फुलबागाही आता आणखी फुलणार आहेत.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे