महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रचाराचा लोहगाव येथे नारळ फोडून उत्साहात शुभारंभ!

लोहगाव ( प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडून राहाता तालुक्यातील लोहगाव येथे प्रचाराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील श्री हनुमान मंदिर येथे मंगळवारी सायंकाळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ नारळ फोडून गावात प्रचार शुभारंभ असंख्य कार्यकर्त्यांचे उपस्थितीत व मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक विविध विकास कामे झाली. व होत आहेत. लोहगावातही अनेक विकास कामे नामदार विखे पा‌. यांच्यामुळे करण्यात आली. नामदार विखे पा. यांच्या माध्यमातून येथे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना लोहगावातून अधिकाधिक मतदान कसे होईल. याकडे कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. तसेच मतदारांनी मोठ्या संख्येने राधाकृष्ण विखे पाटील यांना निवडून द्यावे. असे आवाहन यावेळी लोहगावातील कार्यकर्त्यांनी केले.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला लोहगावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन ,ग्रामपंचायत सर्व सदस्य लोहगाव सोसायटीचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच,कार्यकर्ते ,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे