शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मतदार संघात सात वेळा म्हणजे 35 वर्षे आमदार राहूनही शिर्डी मतदार संघाचे प्रश्न कायम आहेत. दरवेळी डांबरी रस्त्यावरच मुरूम टाकणे म्हणजे विकास आहे का? असा सवाल करत मला पाच वर्षे संधी द्या ,नक्कीच शिर्डीचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन महाविकास आघाडीच्या शिर्डीच्या उमेदवार सौ प्रभावती घोगरे यांनी केले.
शिर्डी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ प्रभावती जनार्दन घोगरे यांचा प्रचार दौरा,व कॉर्नर सभा निमगाव ,निघोज,रुई, सावळीविहीर खुर्द, येथे होऊन सायंकाळी सावळीविहिर बु, बाजार तळ येथे सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अशोकराव आगलावे होते. तत्पूर्वी सुरुवातीला प्रभावती घोगरे यांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, तुम्ही 35 वर्ष विकास केला असता तर ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्याची धडपड केली नसती. मतपत्रिकेवर एक नंबर ला नाव येण्यासाठी धडपड झाली नसती. मात्र विकासापेक्षा सत्ता आपल्याकडे कशी राहील याकडे अधिक लक्ष असलेल्या नेत्यांना मतदारांनीच आता 35 वर्षे विकास का झाला नाही हे विचारले पाहिजे, असी विरोधकांवर टीका करत आपण स्वतः दूध उत्पादक व शेतकरी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी समजतात. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, शेती पिकांना भाव नाही, असे सांगत गेले 35 वर्ष जे झाले नाही ते मी पाच वर्षात करून दाखवेन. माझ्या स्वतःसाठी किंवा वैयक्तिक साठी काही करणार नाही, मात्र समाजासाठी, जनतेसाठी नक्कीच पाच वर्षात काहीतरी करून दाखवेल असे आश्वासन यावेळी त्यांनी देत महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी मामा पगारे, भाऊसाहेब कातोरे, सचिन चौगुले, सिमोन जगताप, अशोकराव आगलावे, आदींची भाषणे झाली.व या सर्वांनी शिर्डी विधानसभेच्या सर्वांगीण आणि सर्व समावेशक विकास करण्यासाठी मोठ्या मताधिक्काने सौ प्रभावती घोगरे यांना विजय करण्याचे आवाहन यावेळी केले.व गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे खासदार निलेश लंके, जयश्रीताई थोरात यांचे प्रभावती घोगरे यांच्या स्मरणार्थ सभा असून या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश आरणे यांनी मानले.
या कार्यक्रमाला साहिल म्हस्के, सुनिता गोकुळ जपे, डॉक्टर शरद भदे, बाळासाहेब काशीद, संजय पगारे, आदी आघाडीतील सर्व पक्षांचे ज्येष्ठ व वरिष्ठ नेते मंडळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments