डॉ. सुजय विखे यांची ना. विखे पा. यांच्या प्रचारार्थ तांबेनगर, प्रवरानगर येथे प्रचार फेरी ! मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी!

लोहगाव (प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचला असून महायुतीचे उमेदवार  ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा होत आहेत. प्रवरानगर व तांबेनगर या परिसरातही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी  प्रचारफेरी केली व राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे यावेळी मतदारांना आवाहन केले.
प्रवरानगर  व तांबे नगर हा प्रवरा कारखानाजवळचा परिसर असल्यामुळे येथे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी  घरोघरी जाऊन तसेच दुकानदारांच्या, व्यवसायिकांच्या महिलांच्या, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. मतदारांशी मनमोकळी चर्चा केली. यावेळी काही ठिकाणी महिलांनी सुजय विखे यांचे औक्षण केले. सुजय दादा विखे पाटील यांच्याबरोबर अनेक मतदारांनी, महिलांनी फोटोही काढले. यावेळी कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे यांचा विजय असो, अशा घोषणाही दिल्या. या तांबेनगर व  प्रवरानगर प्रचार फेरी च्या वेळी  लोहगाव प्रवारानगर परिसरातील नेते,कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, मतदार, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारांनी राधाकृष्ण विखे पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार! असे ठाम आश्वासन यावेळी मतदारांनी डॉक्टर सुजय विखे यांना दिले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे