लोणी खुर्द व लोणी बुद्रुक हे नेहमीच राधाकृष्ण विखे पा.यांच्या पाठीशी! हा विश्वास आहे---डॉक्टर सुजय विखे पाटील

लोहगाव (प्रतिनिधी) सध्याचा काळ बदलला असून जनसेवा युवा मंच अपद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा यापुढे प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे कोणालाही अनेक ठिकाणी अर्ज, अनेक नेते, पुढारी यांना भेटणं, अधिकाऱ्यांना भेटणं ,याची गरज पडणार नाही. प्रश्न व ते सोडवण्याचे काम तातडीने यापुढे केले जाणार आहे .असे आश्वासन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोणी खुर्द येथे केले.
भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल घोगरे पाटील यांच्या घरी प्रचार फेरी दरम्यान स्नेहभोजनाच्या कार्यक्रम‌ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या छोट्याशा कॉर्नर सभेत बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, लोणी बुद्रुक व लोणी खुर्द या आपल्या गावामध्ये मी आलो नव्हतो. तशी वेळ व योग आला नाही. आता मात्र येथे येण्याची गरज असून यापुढे येथील नागरिकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही पुढाऱ्यांना पाहण्याची किंवा शोधण्याची गरज नाही. सुजय विखे यांना  शोधा  व आपले प्रश्न सर्व मार्गी लागतील. असे लोणी येथील प्रचारात डॉक्टर सुजय विखे हे बोलत होते. नागरिकांचे लाईट पाणी असे छोटे छोटे प्रश्न असतात ते अनेकदा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मात्र आता  कामगार आपल्या घरापर्यंत येथील जनसेवा युवा मंच मोबाईलवर डाऊन करून देतील. त्यामुळे मोबाईलवरच आता अर्ज केला की क्षणात तो पोहोचेल व तातडीने तो प्रश्न मार्गी लागेल. असे सांगत
लोणी खुर्द येथे आपलेच एकमेकांचे पाहुणे आहेत .त्यामुळे काही बोललं तर नातेवाईकांना वाईट वाटेल .म्हणून आजपर्यंत आलो नाही. मात्र आता येथे येण्याची गरज निर्माण झाली आहे. येथील मतदार हे राधाकृष्ण विखे यांच्या पाठीशी कायम राहिले आहेत व  हा विश्वास आहे. असे त्यांनी सांगत उपस्थित मतदार कार्यकर्ते नागरिक महिला युवक यांच्या गाठीभेटी घेतल्या. जास्तीत जास्त मतदान घडून आणण्याचे यावेळी त्यांनी सर्वांना आवाहन केले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे