नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ, डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहता व परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला. डॉक्टर सुजय विखे पाटील मतदार संघातील प्रत्येक गावागावात वाड्यावस्त्यांवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. कॉर्नर सभा घेत आहेत. शिर्डी मतदारसंघात तसेच गावागावात विविध योजना, व विकासाचे कामे नामदार विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केली. असे सांगतानाच
त्यांनी मतदारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रगतीशील विचारधारेबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या अनुभवसंपन्न, विकासोन्मुख आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या गरजेवर भर दिला. सुजय विखे पाटील यांनी नामदार विखे पाटील साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांच्या कामाची दिशा अधिक गतिमान करावी. असे आवाहनही यावेळी केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विखे पाटील कुटुंबाने दिलेले योगदान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासाच्या विविध संधींबद्दल चर्चा केली. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेहमीच समाजाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष आहे, राजकारण करण्याबरोबरच समाजकारणावर त्यांचा अधिक भर आहे. असे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रचार फेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधताना सांगितले.
0 Comments