**अस्तित्व बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार.. १४ जणांचे रक्तदान करत जपली सामाजिक बांधिलकी.*

छत्रपती एक्सप्रेस (प्रतिनिधी) सुनील भोसले

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल  व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओढ्कल्या जाते. जिल्ह्यात रक्तक्षय, किडनी चे आजार, सिकल सेल आजारांचे रुग्ण अतीप्रमाणात  असून त्यांच्यासह गरोदर माता व प्रसूत माता यांना देखील रक्तपुरवठा करण्याचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी करीत असते.मात्र  रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्याने  जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली चे जिल्हा शल्य चिकित्सक तथा रक्त संक्रमण अधिकारी यांनी रक्तदान करण्याचे आव्हानाला प्रतिक्रिया देत सामाजिक बांधिलकी  जपण्याच्या दृष्टीने अस्तित्व बहुउद्देशीय संस्था  नवेगाव नी पुढाकार घेत रक्तदान शिबीर आयोजित केले.
 सदर रक्तदान शिबिरात एकूण १४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये अस्तित्व बहुउद्देशीय संस्था नवेगाव चे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन भिकाजी गेडाम सह उपाध्यक्ष रामेश्वर नागभीडकर, सचिव उमेश वेलादी सह संस्थेचे सदस्य तथा मित्रमंडळी यांनी  रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्माणीत करण्यात आले. आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी नी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे