बाभळेश्वर ( प्रतिनिधी) राहता तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बाभळेश्वर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी प्रमोद दादाहरी बनसोडे यांचे नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.
राहता तालुक्यातील बाभळेश्वर ग्रामपंचायतच्या उपसरपंचाची नुकतीच निवडणूक संपन्न झाली. यामध्ये प्रमोद दादा हरी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर प्रमोद दादा हरि बनसोडे यांचा गावातील ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने पुष्पगुच्छ व फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बबलू पाटील म्हस्के, प्रवरा कारखान्याचे संचालक साहेबराव म्हस्के पा., प्रवरा बँकेचे संचालक शंकरराव बेंद्रे,मा. संचालक अण्णा पाटील बेंद्रे, तानाजी पाटील बेंद्रे, सरपंच संगीता श्रीकांत शिंदे , तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल रामभाऊ डहाळे, अजित बेंद्रे, अमृत मोकाशी, दादासाहेब बेंद्रे, केशरबाई माळी, वैशाली बनसोडे, नीता कांदळकर, रिया गुंजाळ,रवि तुपे, ग्रामसेवक रफिक शेख,
आदीसह श्रीकांत शिंदे रवी बेंद्रे नितीन कुलकर्णी, नितीन बनसोडे, विनोद बनसोडे, सचिन डहाळे ,संदीप डहाळे ,अमित डहाळे ,गणेश लोळगे, विशाल पाळंदे, सागर कदम ,विशाल बनसोडे,आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. उपसरपंच पदी प्रमोद बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांचे सर्व क्षेत्रांमधून अभिनंदन होत आहे.
0 Comments