खेड तालुक्यातील भरणे डीएड कॉलेजंच्या माजी विद्यार्थ्यांचा दापोलीत जमला मेळा! गेट-टुगेदर च्या निमित्ताने 26 वर्षांनी जुन्या आठवणींना मिळाला उजाळा!

शिर्डी (प्रतिनिधी )
होतीच आमची डीएडची मैत्री!
जपली मनात अहोरात्री!!

ह्रदयात मित्रप्रेम होते मस्त!
मात्र नोकरी,कर्तव्यात होतो व्यस्त!!

या गेट-टुगेदर मुळे एकत्र आले सर्व दोस्त! जुन्या आठवणीत  झाले व्यस्त!!

येथे मिळाला सव्वीस वर्षांपूर्वीच्या जुन्या स्मृतींना उजाळा!

मागील गप्पा गोष्टीत रंगला हा धम्माल सोहळा!!

भरणे डीएड कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रमाच झाला आगळा वेगळा !
 
कारण हा 64 मित्रांच्या निस्सिम मैत्रीचा जमला होता दापोलीत  मेळा!! 
असे मनोमन म्हणत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथील डीएड कॉलेजच्या सन 1996 -98 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी निसर्गरम्य दापोलीत गेट-टुगेदर करत मोठ्या उत्साहात परत असेच स्नेहसंमेलन घेवू,परत भेटू ,अशा आना भाका घेत यावर्षीच्या गेट-टुगेदरला बाय बाय करत निरोप घेतला. मात्र या गेट-टुगेदर ची आठवण सर्वजण आपल्या हृदयातील एका कोपऱ्यात साठवून आपापल्या गावी परतले. व सव्वीस वर्षांनी भरलेला गेट-टुगेदरचा  हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शिक्षण घेत असताना जीवनात मैत्री, नाते याची काहीच कल्पना नसताना जे बंध जुळतात ते अखेरपर्यंत टिकतात. शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हे शैक्षणिक जीवन आनंददायी उत्साही असतं. ते दिवस आठवले म्हणजे कधी  नकळत गालावर हसू तर कधी डोळ्यांत आसू येतं, विद्यालय किंवा महाविद्यालयात असताना अभ्यासासोबतच दंगा-मस्ती,खेळ,गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, टिंगल टवाळी, शिक्षकांचा ओरडा हे समीकरण ठरलेलं असत. अशा या समीकरणाचे क्षण हे नंतर मात्र मनाला आठवण येताच भावुक करून टाकणारे असतात.व ते  मंतरलेले दिवस डोळ्यासमोर तरळून जात असतात.कॉलेजमधील त्या  फक्त गोड आठवणी,  त्या दिवसातील  ती जिगरी मैत्री, प्रत्येकाच्या नेहमी शेवटपर्यंत स्मरणात असते. हे मात्र निश्चित!  महाविद्यालयाचे दिवस हा हा म्हणता निघून जातात .आणि मग चालू होते भविष्यासाठीची वाटचाल. या वाटचालीमध्ये हे शालेय जीवनातले मित्र, मैत्रिणी दुरावतात.कारण प्रत्येक जण या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी व टिकवलेल्या अस्तित्वाला एक वलय प्राप्त करण्यासाठी , धडपड सुरु करतो . कुणी नोकरी , कुणी व्यवसाय करतो, कोणी शेती करतो ,पण वेगवेगळ्या गावा,त वेगवेगळ्या ठिकाणी जातो. प्रत्येक जण आपल्यापासून दूर जातो.  महाविद्यालयीन जीवनात रक्ताचं नातं नसलं तरी मैत्रीत प्रेम व  जिव्हाळा असतो. दोस्ती नातेबंधा पेक्षाही सुखदायक असते. महाविद्यालयीन जीवनातील  मैत्री ही वेगळीच चीज आहे. ती निर्व्याज्य ,पवित्र अशी भावना असते. कोणतीही अपेक्षा अथवा लाभ मिळावा अशी भावना अजिबात नसूनही, त्या सोबत्यांची  आठवण सतावत असते. कधीतरी त्यांची भेट व्हावी… जुन्या शैक्षणिक कालावधीतील आठवणींना उजाळा मिळावा… कालचक्र उलटे फिरून त्या निरागस जीवनात पुन्हा शिरता यावे यासाठी  मन आतुर होते. व त्यासाठीच आता या महाविद्यालयीन त्या काळातील आठवणींना उजाळा मिळावा म्हणून गेट-टुगेदर, माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, मेळावे भरविले जात आहेत. असाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथील डीएड महाविद्यालयातील 1996 98 डीएड कॉलेजमधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर हा पुनर्मिलनाचा आनंदोत्सव सोहळा कार्यक्रम नुकताच 26 वर्षांनी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम करत व आनंदात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील साखरवली पितांबरी फार्म येथील निसर्गरम्य अशा वातावरणात साजरा झाला. भरणे , तालुका खेड,जिल्हा रत्नागिरी येथील डीएड महाविद्यालयात 26 वर्षांपूर्वी राज्याच्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण आदी  विविध भागातून कानाकोपऱ्यातून निवड झालेले विद्यार्थी येथे डीएड शिक्षणासाठी आलेले होते. त्या काळात कोणाची जास्त ओळख नव्हती. मात्र एक एक दिवस शिक्षण घेत असताना हळूहळू ओळख होत गेली .ओळखीचे रूपांतर मैत्रीत, घट्ट मैत्रीत झाले आणि डीएड चे दोन वर्ष कसे निघून गेले हे कोणालाही कळाले नाही. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत डीएड चे शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या परीने नोकरी, व्यवसाय ,शेती करू लागला आणि डीएड कॉलेजमधील मैत्री हळूहळू दूर दूर होत गेली. मात्र मनातील मैत्रीची सल मात्र कायम राहिली, आणि ती सल दूर व्हावी व पुन्हा एकदा सर्व मित्र मैत्रिणी भेटाव्यात म्हणून एक डिसेंबर 2024 रोजी 26 वर्षानंतर पुन्हा या डीएड कॉलेजमधील सुमारे 68 विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आल्या गेट-टुगेदरचा मोठा उत्सव सोहळा येथे संपन्न झाला. गेट-टुगेदर च्या निमित्ताने दापोलीच्या निसर्ग रम्य वातावरणातील एका हॉटेलत  सर्वजण एकत्र येताच व एकमेकांना पाहताच प्रत्येकाला हसू व डोळ्यात आसू येत होते. प्रत्येक जण एकमेकांना अलिंगन देत होते .एकमेकांच्या तब्येतीच्या ,कुटुंबाच्या ,नोकरी, व्यवसायाच्या चर्चा करत पुन्हा एकदा त्या महाविद्यालयीन मैत्रीच्या जीवनात घुसण्याचा एक छोटासा प्रयत्न येथे होत होता. प्रत्येक जण आपली खुशाली सांगत होता .एकमेकांचे हस्तादोलन ,गळाभेट, फोटो सेशन होत होते. त्या काळातील शिक्षक तसेच महाविद्यालयातील इतर कर्मचारी, होस्टेल, मेस, तसेच आसपास असणारे ओळखीचे दुकानदार, हॉटेल वाले यांचेही अधून मधून आठवणी निघत होत्या. वर्गातील, मैदानावरील गप्पाही रंगत होत्या. असे सर्व झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे एका स्टेजवर गेट-टुगेदर  कार्यक्रमात प्रत्येकाने येऊन आपले नाव ,पत्ता ,ओळख ,नोकरी, व्यवसाय याबद्दल माहिती दिली. या गेट-टुगेदर कार्यक्रमात अशोक गिरवले यांनी एमपीएससी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  होऊन  त्यांची लातूर विभागात कृषी उपायुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्व विद्यार्थ्यांच्यां वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे  पोपटराव  पाटील, बेळगाव हे केंद्रप्रमुख झाले आहेत. त्यांचाही सन्मान करण्यात आला.आयोजनाचे उत्तम काम केल्याबद्दल खेड मधून श्री विजय पालकर ,संतोष चव्हाण ,चंद्रकांत खेडेकर, भगवती उतेकर ,दापोली मधून संतोष केळकर, अशरफ अजर्लेकर , मुंबई मधून हेमंत तांबट, पुणे येथून श्री दीपक जगताप यांनी या गेट-टुगेदरा संदर्भात सर्वांबरोबर समन्वय साधून उत्तम काम केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार येथे करण्यात आला.सव्वीस वर्षानंतर या भरणे डीएड कॉलेजमधील सर्व माजी विद्यार्थी, एकमेकांचे मित्र मैत्रिणी भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता. सर्वांनाच फेटे बांधून सन्मानित करण्यात आले होते.असे गेट-टुगेदर वर्षातून- दोन वर्षातून एकदा तरी भरवावे  अशा सूचनाही काहींनी केल्या. सर्वजणांनी गप्पागोष्टी, चर्चा करत स्नेह भोजनाचा आनंद घेतला. व दिवसभर हा कार्यक्रम मोठा आनंदात रंगला व शेवटी वेळेअभावी  हा गेट-टुगेदर चा कार्यक्रम आटोपता घेऊन प्रत्येकाने एकमेकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत बाय-बाय करत, एकमेकांचे मोबाईल नंबर घेत, निरोप घेतला. व हा गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न व्हावा म्हणून सर्वच बहात्तर माझी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. मात्र काही कारणास्तव चार विद्यार्थी आले नाहीत. मात्र 68 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या गेट-टुगेदरला आवर्जून उपस्थित राहिले. येथे सर्वच मित्र असल्यामुळे कोणी कोणाचे स्वागत किंवा आभार मानले नाही .कारण ते उचितही नव्हते. कारण सर्वजण सारखेच होते. या कार्यक्रमाचे सर्व 68 विद्यार्थ्यांनी चांगले आयोजन केले. सर्वांनीच या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी परिश्रम मेहनत घेतली. त्यामध्ये सर्वांचाच वाटाआहे. 
श्री.भिकू जानकर.सौ.सनिरीता बाईत,श्री.विजयपालकर,
सौ.स्नेहल सुधाकर बामणे.सौ.कांचन सुनिल जाधव/भोळे,श्री.गोपीनाथ नाना पवार,
श्री.अशोक सुखदेव गायकवाड..श्री. चंद्रकांत सुरेश खेडेकर,श्री. अंकुश बारकू भानसे, श्री. अशरफ आंजर्लेकर
 सौ.सुजाता प्रविण पवार/वाघ,
श्री. जलोषन जगन्नाथ नार्वेकर,
श्री . संतोष चव्हाण,
सौ.तृप्ती काताळे/डिके,
सौ.संगीता  जाधव /मेढेकर,
श्री.दिपक जगताप,
सौ.पूर्वा जाधव,
संतोष सोनू कदम,
किशोर गंगाराम धुत्रे,श्री.अशोक बाजीराव गिरवले,
.सौ.शरयू धामापूरकर/ चिपळूणकर श्री.जिभाऊ बागूल,
 श्री.जगन्नाथ सुरेश आहेर,
श्री.भास्कर जंगम,
सौ.अस्विनी मोरे /शिंदे,
श्री.सचिन पवार,
 सौ.समिधा रांगणकर /नार्वेकर,
 सौ.मनीषा गोठल/भडवलकर, 
 श्री. महेश राणे,
श्री.अजय कालेकर,
श्री.पोपट पाटील सौ.गीता राजपूत,
 श्री.अनंत धाडवे,
 श्री. हेमंत तांबट,
 श्री. शहाजी मराडे,
श्री. सुभाष जोशी,
.श्री. संजय दामधर,
 .श्री.शशिकांत कदम,
. श्री. हरिष जाधव. श्री. शिवराम राघव, श्री.संतोष येलकर
श्री.संदिप नाडणकर,
 श्री.आनंदराव आहिरे,
श्री.श्रीकांत चौधरी,
 श्री.बापूराव खामकर,
 श्री.विनायक पवार,
श्री.सचिन शिंदे,
 श्री.भागवत बुधकर,
 सौ.सुजाता बारसकर /मोरे,
 सौ.शुभदा पाटणकर,
श्री.बाळासाहेब गुरुकुले,
श्री.विठ्ठल गावडे. सौ.नेहा दिलीप भातडे.
श्री.राकेश शिंदे. श्री. गणेश गुलाब साळुंखे,
श्री.सुंदर राठोड,
सौ.उज्ज्वला उमेश गुरव,
सौ.सीमा कदम/चव्हाण,
 सौ.वैशाली सोनवणे,
श्री.संजय नामदेव कारंडे,
श्री.देवेंद्र दत्ताराम शिर्के,
श्री. मंगेश चंद्रकांत तळदेवकर.श्री. विठोबा रसाळ,
श्री. सचिन गमरे,
आदींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून  या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर धोत्रे यांनी केले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे