सोनगाव (शकुरभाई तांबोळी ) -
राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे रामनवमी ते हनुमान जयंती निमित्त गुरुवर्य ब्रम्हलीन सदगुरू नारायणगिरीजी महाराज व मणिकगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ग्रामदैवत हनुमंतराय यांचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष आठवे दि.६एप्रिल २०२५ रविवारपासुन सुरू झाला असून
ग्रामदैवत हनुमंत हे जागृत देवस्थान आहे.सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्याने परीसरात भक्तीमय वातावरण आहे.सप्ताहनिमीत्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांचा किर्तन महोत्सव आयोजित केला आहे.या सप्ताह निमित्त पहाटे काकडा,ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,संत तुकाराम गाथा भजन,सायंकाळी ५ वा.हरिपाठ,अखंड विना वादन,किर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे.या सप्ताह निमित्त रविवारी सकाळी १० वा. ह.भ.प.दत्तगिरीजी महाराज उबंरेश्वर,वंरवडी देवस्थान यांचे हस्ते ध्वजारोहण होणार असून रोज सायंकाळी आठ ते दहा या वेळेत किर्तन महोत्सव होणार आहे.
या किर्तन महोत्सवामध्ये ह.भ.प.दत्तगिरीजी महाराज उबंरेश्वर,ह.भ.प.अनीताताई जाधव, ह.भ.प.भागवताचार्य खामकर महाराज, ह.भ.प.वैशालीताई काळे,ह.भ.प.पल्लवीताई तोरडमल,ह.भ.प योगी दिपकानंदजी महाराज , ह.भ.प.राधीकाताई घुणे यांचे किर्तन होईल व दि. १३ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता परमपूज्य ह.भ.प.उत्तम महाराज गाढे पुणतांबा यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.त्यानां ज्ञानराज माऊली सेवा भावी संस्था आश्वी खुर्द येथील वारकरी संस्थेतील मुले,गायनाचार्य, बालमृदुगांचार्य,व हनुमान भजनी मंडळ,संत सावता महाराज भजनी मंडळ यांची साथ असेल.शनिवार दि.१२ रोजी सायंकाळी ४ वा.श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाची मिरवणूक त्यानंतर ह.भ.प.विजयानंदजी महाराज सरला बेट व लोणी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय यांच्या हस्ते दिपवंदनाचा कार्यक्रम होईल.
हा सप्ताह पंचक्रोशीत प्रसिद्ध असून अनेक दानशूर भाविक तसेच अन्नदाते या सप्ताहामध्ये मोठे योगदान देत असतात. दररोज सायंकाळी अनेक अन्नदात्यांनी महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन केले आहे,तसेच काल्याचे किर्तन झाल्यावर महाप्रसादाचे वाटप होईल. या किर्तन महोत्सवास परीसरातील भाविक-भक्तांनी उपस्थित राहून किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सप्ताह आयोजन कमीटी,हनुमान भजनी मंडळ,संत सावता भजनी मंडळ,श्री स्वामी समर्थ ग्रुप,शिवजंयती उत्सव समीती,युवा मंच हनुमंतगाव,ज्ञानदिप वाचनालय,सावता महाराज मिञ मंडळ,बिरोबा मिञ मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments