पुणे (प्रतिनिधी)
पंजाब नॅशनल बँक, शाखा पिंपळे गुरव, पुणे यांच्या वतीने सायबर जनजागृती दिनानिमित्त १४.०२.२०२५ रोजी काशी विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे गुरव, पुणे येथे हिंदी निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. हिंदी निबंध लेखन स्पर्धेत एकूण १२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. श्री देवेंद्र सिंह (सर्कल हेड, पुणे सर्कल), श्री विश्वनाथ हिरेमठ (सचिव, विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल), श्रीमती रागिणी अविनाश देशपांडे (मुख्याध्यापिका), श्री नितीन शिंदे (शाखा व्यवस्थापक, शाखा पिंपळे गुरव, पुणे) यांच्यासह सर्व शिक्षक व २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली व हिंदी निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम आणि सायबर जनजागृतीशी संबंधित पथनाट्य सादर केले, जे अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायी व माहितीपूर्ण होते. या सोहळ्यात विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. श्री देवेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, पंजाब नॅशनल बँक विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात खूप सक्रिय मदत करीत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रागिणी अविनाश देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पंजाब नॅशनल बँकेचे मनापासून आभार मानले.
0 Comments