श्रीमती. मंदोदरी नामदेव महाडिक यांचे मंगळवार दि.14. आक्टोबर 2025 रोजी रात्री. 10:37 च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले, त्या 92 वर्षाच्या होत्या.


प्रतिनिधी: 

शिंदवणे :युवा ग्रामीण पत्रकार संघांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. गणेश महाडिक यांच्या त्या आजी होत्या.
 सघन शेतकरी घरात जन्मलेल्या श्रीमती मंदोदरी नामदेव महाडिक ह्या गोर-गरिबांच्या कैवारी तसेच मनमिळावू व गमतीदार स्वभावाच्या होत्या. त्यांच्या या स्वभावामुळे  त्यांना पूर्वीपासून आपले जिवन उल्हासात व आनंदात जगणाऱ्या  श्रीमती मंदोदरी नामदेव महाडिक यांनी कुणालाही नाराज केले नाही. रडत येणाऱ्यास त्यांनी नेहमी हसवत घरी पाठविले. साधे जिवनमान असलेल्या श्रीमती. मंदोदरी नामदेव महाडिक यांनी आपल्या मुलांनाही चांगले संस्कार देत वाढविले. त्यांची गावात त्यांची चांगली पैठ होती. त्यांचा शब्द कधी खाली गेला नाही.  त्यांच्या अचानक निधनाने शिंदवणे गावासह तालुका परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा अंतिम  विधी काल बुधवार दि.15 आक्टोबर 2025 रोजी सकाळी 09:00 वा. त्यांच्या रहात्या घरून निघून वाकवस्ती  स्मशान भुमी शिंदवणे येथे करण्यात आला. व दशक्रिया विधी शनिवार दि.18 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 8 वा. ग्रामपंचायत पाठीमागे शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथे होईल .त्यांच्या पाठीमागे पाच मुले,नातवंडे असा मोठा  आप्त परिवार आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. गणेश महाडिक. पत्रकार अमोल महाडिक.यांच्या आजी व अडव्होकेट. श्री. रमेश महाडिक यांच्या त्या चुलती होत्या.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!