राहाता तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील सोमैय्या विद्यामंदिरच्या अक्षरा इंगळे यांची शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड!

शिर्डी ( राजकुमार गडकरी)- अहिल्यानगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सोमैया स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई व सोमैया विद्यामंदिर,लक्ष्मीवाडी ता. राहाता आयोजित पुणे विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी येथे दिनांक 14 व 15ऑक्टोबर 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडल्या. सोमैय्या विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती  धायताडक‌ सर यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले.
 सदर स्पर्धेत  पुणे विभागातून सुमारे 42संघ व 250 खेळाडू सहभागी झाले होते. 14,17,19 वर्षाखालील मुलामुलींच्या गटात या स्पर्धा पार पडल्या.पूर्ण स्पर्धेवर पुणेकरांचे वर्चस्व राहिले एक दोन अपवाद वगळता स्पर्धेच्या सर्वच आघाड्यांवर पुणेकरांनी पूर्ण वर्चस्व गाजविले. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताकडून खेळणारे शूरेन सोमण सारखे खेळाडूही सहभागी झाले होते. अ.नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोमैया विद्यामंदिर च्या  अक्षरा इंगळे या खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ती राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे .स्पर्धेच्या आयोजनात  अकॅडमीचे प्रमुख एझाझ खान सर,आदित्य सिंग सर, जी. बी. एल. डायरेक्टर तथा विद्यालयाचे सेक्रेटरी श्री. सुहास गोडगे, जिल्हा क्रीडाधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरंगे, श्री संतोष वाबळे,रोहन शिंदे सर,संजय धुमाळ सहकार्य लाभले. मुख्याध्यापक श्री.मारुती धायतडक सर यांच्या कल्पक नेतृत्वात या स्पर्धेचे व्यवस्थापन क्रीडा शिक्षक श्री.अमोलिक संजय,महेश ढेपले, रुपाली टेके ,दीपिका राक्षे ,शुभांगी राऊत,यांनी केले. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!