शिर्डी( प्रतिनिधी) उत्कृष्ट व्यवस्थापन, प्रामाणिकपणा, मेहनत व विश्वास संपादन करून कोणताही व्यवसाय केला तर नक्कीच यशस्वी होतो .असाच प्रयत्न साई सरकार दूध डेअरीने केल्यामुळेच आज ही डेअरी चांगल्या प्रगतीपथावर गेली असल्याचे मत सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांनी व्यक्त केले आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील साई सरकार दूध डेअरी च्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभासद दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त मिठाई व भेटवस्तू देण्यात आल्या .या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला या दूध डेअरी चे मार्गदर्शक विजयराव होन, माजी उपसरपंच गणेश कापसे, प्रभाकर जपे, बाळासाहेब काशीद, शरद जपे, राजेंद्र कापसे, गणेश जपे ,सोमनाथ जाधव, बाळासाहेब गमे, सागर जाधव, राम व लक्ष्मण जाधव,या डेअरीचे संचालक वैभव काशीद, प्रवीण जाधव, संजय जपे, दिलीप खंडीजोड, आदी दूध उत्पादक सभासद उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब जपे पुढे म्हणाले की मागे लंपी आजार आला असताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने जाहीर केलेले प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे या डेअरीने प्रामाणिकपणे दूध उत्पादकांना दिले. असे सुमारे नऊ लाख रुपये त्यांनी यावेळी वाटप केले होते असेही सांगितले.यावेळी माजी उपसरपंच गणेश कापसे यांनी म्हटले की, या साई सरकार डेअरीने दहा लिटर दुधापासून चार वर्षात अडीच हजार लिटर दुधापर्यंत मजल मारली असून दूध उत्पादकांचे अधिकाधिक हित जपण्याचा प्रयत्न या साई सरकार डेअरीमार्फत केला जात आहे. असे सांगितले. तर विजयराव होन यांनी साई सरकार डेअरीमार्फत सर्व सभासद दूध उत्पादकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला असून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. असे म्हटले. तर शेवटी सोनाई खात्याबद्दल माहिती देण्यात आली. नंतर साई सरकार डेअरीचे संचालक वैभव काशीद यांनी सर्वांचे आभार मानले. तत्पूर्वी सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.
0 Comments