शिर्डी ( प्रतिनिधी)दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रुढीपरंपरेनुसार शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने तुळशी विवाह सोहळा श्री द्वारकामाई मंदिरात मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सोमवारी सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते तुळशी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेश पूजनाने झाली, त्यानंतर तुळशी-विष्णू विवाह विधी, आरती, नैवेद्य दाखविणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख श्री. विष्णू थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ, तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments