शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील गणेशनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.नवीन शैक्षणिक वर्ष पंधरा जून सोमवार रोजी सुरु झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके वाटप करण्यात आली, तसेच अहिल्यनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना .राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमिताने रांजणगाव खुर्द तालुका राहाता येथील सरपंच सौ सुनीताताई सोपानराव कासार व दत्तगुरु पतसंस्था गणेशनगर पतसंस्था चे आद्य प्रवर्तक श्री सोपानराव कासार यांच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच सर्व नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चॉकलेट, कार्टून टोप्या, खेळणी देऊन स्वागत केले. पहिल्याच दिवशी प्रभात फेरी, मिष्ठान्न भोजन, विविध प्रकारचे मनोरंजक खेळ घेण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी ताई घोगळ , सदस्य जयंतराव गिरमे, दानशूर व्यक्ती व एस टी महामंडळ आदर्श कर्मचारी राजेंद्र जाधव,तसेच सर्व सदस्य, पालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. शाळेचे वतीने श्री व सौ कासार यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रम सूत्रसंचालन कैलास चिंधे आणि आभार दत्ता गायकवाड यांनी मानले.
0 Comments