मराठा आरक्षण व शासनाचे त्याकडे होत असलेले दुर्लक्ष याचा निषेध म्हणून शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन!

शेवगाव (प्रतिनिधी)मराठा आरक्षण व मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे गेल्या चार दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे .मात्र या उपोषणाकडे शेवगावचे तहसीलदार व प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केला असून येथे साधी भेट सुद्धा दिली नाही याचा निषेध म्हणून व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सोमवार दुपारी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यास चालढकल करणाऱ्या शासनाचा ,प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तसेच तहसीलदार यांनी उपोषण स्थळी भेट दिली नाही म्हणून त्यांचाही निषेध करण्यात आला . तसेच एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या. या रस्ता रोको साठी सकल मराठा समाजातील युवक ,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ता रोको मुळे दोन्ही बाजूने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार न घडता हा रस्ता रोको येथे करण्यात आला.व लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिले गेले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने या आंदोलन स्थळी विविध नेत्यांनी आपल्या भाषणातून दिला.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे