कोल्हापूर जिल्ह्याचे विविध प्रश्न समस्या सोडवण्यासाठी मुंबईत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन-- नामदार राधाकृष्ण विखे पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी)आज कोल्हापूर जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींची संयुक्त आढावा बैठक घेऊन जिल्ह्याचे विविध प्रश्न आणि मागण्या जाणून घेतल्या व या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुंबईत लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेण्याबाबतचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
 शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरीक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अमित माळी, बाबासाहेब वाघमोडे, अश्विनी जिरंगे, तहसिलदार शितल मुळे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे