शितल निर्मळ हिची सहाय्यक अभियंता पदी निवड,ग्रांमस्थांकडुन सत्कार.

पिंपरी निर्मळ:(वार्ताहर) राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील कु.शितल लक्ष्मण पा.निर्मळ हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत जलसंपदा विभागात सहायक अभियंता पदावर निवड झाली असुन १५ ऑगस्ट रोजी ग्रांमस्था कडुन तिचा सत्कार करण्यात आला आहे.



  स्पर्धा परीक्षेतुन पिंपरी निर्मळ येथील अनेक मुलांनी राजपत्रीत अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे.याच बाबीची परपंरा राखत येथील कु.शितल लक्ष्मण पा.निर्मळ हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत जलसंपदा विभागात सहायक अभियंता पदावर निवड झाली आहे. यापदावर निवड झाल्याबद्दल पिंपरी निर्मळ ग्रांमस्थांच्या वतीने तिचा व तिच्या माता पित्यांचा १५ ऑगस्टला ग्रांमस्थांच्या व विविध संस्थाच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी गावच्या उपसरपंच सौ.वनिता घोरपडे,तंटा मुक्तीचे अध्यक्ष दशरथ निर्मळ,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विलायते,माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री.चव्हाण,माजी सरपंच एन.टी निर्मळ,महेश वाघे,दत्तात्रय निर्मळ,योगेश निर्मळ,बी.जि.निर्मळ यांचे सह ग्रांमस्थ व विदयार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे