श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे दीड लाख रुपये किमतींची अवैध देशी विदेशी दारू केली जप्त!

श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत देशी-विदेशी अशा सुमारे दीड लाख रुपये किमतींची अवैध दारू जप्त केली असून चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे प्रसिद्ध अशा मतमाउलीची यात्रा नुकतीच संपन्न झाली. या यात्रेच्या काळामध्ये येथे मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याची गुप्त खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांंसमवेत हरेगाव येथे विविध ठिकाणी छापे टाकले. या छाप्यामध्ये सुमारे दीड लाख रुपये किमंतीचे देशी विदेशी गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. अवैध दारू विक्री करणारे श्रीरामपूर तालुक्यातील
उंदीरगाव येथील राहणारे राहुल येवले( वय 30) रामदास भिंगारे (वय 45) संजय अनगडे( वय 47) व मीनाक्षी गायकवाड (वय 30 )या सर्वांवर मुंबई दारूबंदी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!