"अहमदनगर महामार्गाच्या अडचणीबाबत महसूलमंत्र्यांची आढावा बैठक उत्साहात"

मुंबई/पालघर (प्रतिनिधी) भव्य ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा लाभलेल्या आणि राजकिय दृष्ट्या महत्वपुर्ण असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडीया (NHAI) आणि नॅशनल हायवे यांचे मार्फत सुरू असलेल्या कामाबाबत भूसंपादन,गौण खनिज व इतर विषयासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत तसेच निळवंडे व कुकडी प्रकल्पामधील भूसंपादन व इतर अडचणींसंदर्भात आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मार्फत करावयाच्या शिर्डी विमानतळ येथील भूसंपादन व विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अडी-अडचणींसंदर्भात नुकतीच सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे महसूल मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक उत्साहात पार पडली.

सदर बैठकीत अहमदनगर-मनमाड आणि अहमदनगर-पाथर्डी रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा असा आदेश देण्यात आला. त्याचबरोबर साकळाई योजना, कुकडी पाणी व निळवंडेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली.

त्याच बरोबर शिर्डी विमानतळ येथे नाईट लँडिंग आणि टर्मिनल बिल्डिंगच्या कामाबाबत देखील चर्चा या बैठकीत करण्यात आली.

याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटिल,खासदार सदाशिव लोखंडे,माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,आमदार प्रा.राम शिंदे, आमदार.रोहित पवार,आमदार. संग्राम जगताप,वैभव पिचड, अरुण मुंढे,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडीया (NHAI) तसेच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी, पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी व विमानतळ प्राधिकरणाचे सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे