शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान चे शहरांमध्ये श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल असे दोन रुग्णालय असून श्री साईनाथ रुग्णालयात आत्तापर्यंत महिलांच्या( डिलिव्हरी) बाळंतपण होत होते. श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये होत नव्हते. मात्र 31 ऑगस्टला शिर्डीत अतिवृष्टी झाल्याने व साईनाथ हॉस्पिटल परिसर पाण्यामध्ये गेल्याने काही दिवस साईनाथ रुग्णालय बंद असल्या कारणामुळे यातील रुग्ण श्री साई बाबा सुपर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते .अशा या रुग्णांपैकी एका महिलेची नैसर्गिक डिलिव्हरी शिर्डीतील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये सुखरूप पणे आज 8 सप्टेंबर रोजी सकाळी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांचे उपस्थितीत सुखरूपपणे करण्यात आली. आतापर्यंत येथे सुपर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली नव्हती. मात्र पहिल्यांदाच येथे श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये महिलेचे डिलिव्हरी करण्यात आली आहे. श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल झाल्यानंतर प्रथमच सुमारे वीस वर्षानंतर ही डिलिव्हरी सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका यांच्या कडून करण्यात आली. व तीही हेमंत शेजवळ या पत्रकाराच्या मुलीची म्हणजे मोनिका सागर अहिनवे यांची डिलिव्हरी व तीही नैसर्गिकरीत्या व सुखरूप पणे करण्यात आली. व कन्यारत्नही प्राप्त झाले. त्यामुळे येथील सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये व आनंद व्यक्त होत आहे. या डिलिव्हरी नंतर उपस्थितांनी व या मुलीच्या परिवाराने जिलेबी, पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. तांबे, डॉक्टर अशोक गावित्रे, डॉ. महेंद्र, डॉ.सौ. गाडेकर मॅडम, पठाण मॅडम, सौ दिवे. डॉक्टर भांगे, आदींसह वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक सेविका व हॉस्पिटल कर्मचारी या महिलेचे, मुलीचे नातेवाईक उपस्थित होते.
0 Comments