शिर्डी (प्रतिनिधी) शहरात एक धक्कादायक घटना घडली असून ज्ञानाचे अतिशय पवित्र मंदिर असलेल्या जिल्हापरिषद शाळेतील दोघा शिक्षकांनी शाळेतील 8 वी इयत्तेतील लहान लहान मुलींना चक्क अश्लील व्हिडिओ दाखवत,शरीराच्या चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत,अश्लील भाषेत शिव्या देत लज्जास्पद वर्तन केल्याने शिर्डीसह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत मुलींनी शाळेतील इतर शिक्षकांकडे तक्रार केली असता त्यांनीदेखील संताप व्यक्त करत पालकांना याबाबत सांगा असे सुचविल्याचे तसेच हा किळसवाणा प्रकार चक्क इयत्ता चौथी पासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती मुलींनी दिलीय. याबाबत पालकांना सांगितल्यास पुन्हा शाळेत पाठवणार नाही आणि शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच राहील या भीतीने मुलींनी पालकांना काही सांगितले नाही.
या शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनेबाबत मुलींनी जेव्हा आपल्या घरी जात पालकांना सांगितले तेव्हा पालकांनी मोठ्या संख्येने शाळेत येत त्या नराधम शिक्षकास चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून शिर्डी पोलिस स्टेशन मध्ये या संतापजनक प्रकाराबाबत चौकशी करून त्या दोघा शिक्षकांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाई करत असल्याचे शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी सांगितले
0 Comments