शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे मा.श्री.आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या महसूल दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री पदी निवड झाली असून त्यांच्या या मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शिर्डी विधानसभा मतदारसंघात व नागरिकांमधून मोठा आनंद व्यक्त होत असून त्या प्रित्यर्थ व श्री गणेशोत्सव निमित्ताने नुकतेच शिर्डी मतदारसंघात मिठाई वाटप करण्यात आली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नंतर सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या महसूल मंत्री या मोठ्या मंत्री पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मतदारसंघात नागरिकांमधून, मतदारांमधून मोठा उत्साह ,आनंद आहे.शिर्डी मतदारसंघातील गावागावात नामदार राधाकृष्ण विखे यांची मंत्री पदी निवड होताच कार्ययकर्त्यांमधे जल्लोषाचेे वातावर निर्माण होऊन फटाक्यांचीी आतिषबाजी करत, व गुलालाची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात येऊन आनंद व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री पद नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाल्यानंतरही मोठा आनंद झाला व त्या प्रित्यर्थ संपूर्ण मतदारसंघात श्री गणेश उत्सव निमित्ताने मिठाईचे वाटप करण्यात येत आहे. लोणी,लोहगाव ,रूई, सावळीविहीर बुद्रुक खुर्द व मतदार संघातील संपूर्ण गावांमध्ये नुकतेच ना. राधाकृष्णजी विखे पा.यांच्या सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्याकडून घराघरात जाऊन या मिठाईचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी ना. विखे यांचे सर्व कार्यकर्ते, तालुका व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,मतदार यावेळी उपस्थित होते.
0 Comments