सन्मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटलांची मंत्रीपदी निवड झाल्याने व गणेशोत्सवा निमीत्त गोगलगांव येथे मिठाईचे वाटप...

गोगलगांव (प्रतिनीधी)-सुरेश ठोके.

लोकनेते पद्मभूषण स्व.बाळासाहेब विखे पाटलांनी गोगलगांव दत्तक घेवून गावकर्‍यानां नेहमी सन्मानाची वागणूक दिलेली होती.त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून हाच वारसा सन्मा.मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,मा.जिल्हा परीषद अध्यक्षा-सौ.शालीनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी पुढे चालवला असून गोगलगांवकरानां नेहमी कूटूंबातील सदस्य म्हणूनच वागवले आहे.त्याची प्रचीती म्हणून विखे कुटूंबीयांच्या आजपर्यतच्या राजकीय वाटचालीस गोगलगांवचे तरूणवर्ग,मतदार व कार्यकर्ते मेहनतीने पाठबळ देत असून विखे कुटूंबीय सुध्दा गोगलगांवकराच्या सुखदुख:त सहभागी होत असून दुख:ची उणीव भरून काढतात.

त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या महसूल मंत्री या मोठ्या मंत्री पदाचा शपथविधी होताच गोगलगांवकरांनी फटाक्यांच्या आतशबाजीने व गुलालाची उधळन करून सन्मा.मंत्री राधाकृष्ण विखे साहेबांचे स्वागत केले याच नात्याच्या ऋणानुबंधाने सन्मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटलांनी गोगलगांवकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व त्या निमीत्ताने तरूण कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जावून मिठाईचे वाटप केले.

या कार्यक्रमास रामप्रसाद मगर, नामदेव पांढरकर, मारूती ठोके, संतोष दुशिंग,   मच्छींद्र गायकर,  शांताराम कांदळकर, मुरलीधर दुशिंग, भागवत गुजर, राधाकृष्ण गायकर, सारंगधर सातकर, रंगनाथ माघाडे, विष्णु खाडे, गोरख गुळवे, दिपक गोर्डे, विठ्ठल ठोके,  राजेंद्र रघुनाथ गायकर,  निवृत्ती पांढरकर, प्रभाकर मगर,  संतराम चौधरी,  बादशहा चौधरी, रतन माघाडे, रावसाहेब खाडे, चंद्रभान चौधरी,  सारंगधर दुशिंग, संतोष माघाडे,  भाऊसाहेब मगर,  बाबासाहेब सयाजी चौधरी,   दादासाहेब तनपुरे,  अरूण लोळगे,  संतोष गुजर, सुदाम चौधरी,  सुनिल चांगदेव मगर,  बबन रूंजा खाडे, शंकर पगारे,  विलास माघाडे,  यशवंत पगारे,   केशव माघाडे,  माणिक गोर्डे आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे