राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रसिध्द होणार आहेत. या प्रारूप मतदार याद्यांवर सर्वसामान्य नागरिकांनी १८ ऑक्टोंबर २०२२ पूर्वी हरकती नोंदवाव्यात. असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या साकुरी, रांजणखोल, खडकेवाके, सावळीविहीर बु., लोहगाव, डोऱ्हाळे, आडगाव खु., न.पा.वाडी, निघोज, नांदुर्खी बु., नांदुर्खी खु.,व राजूरी या ग्रामपंचायती तसेच नव्याने ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकासाठी प्रारूप मतदार यांच्या प्रसिध्दी होणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २१ ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द होणार आहे.
सदर प्रारुप मतदार यादी तहसील, पंचायत समिती, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिध्द केली जाणार आहे. या प्रारूप याद्यांवरील हरकती तहसील कार्यालय राहाता येथी लेखी स्वरुपात १८ ऑक्टोंबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहनही तहसीलदार श्री कुंदन हिरे यांनी केले आहे.
0 Comments