अतिवृष्टीने शेतकरी मोठ्या संकटात असुन उध्वस्त झाला आहे.खरिप पिकं पाण्यात वाहून गेले आहे.मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून अदयाप कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी स्वस्थ न बसता संघटीत होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे शेतकऱ्यांनी मोठ्या अशाने ८० रु गुंठ्या प्रमाणे पिकविमा हप्ता भरला एवढी मोठी नासाडी होऊन ही तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ रु ३७ पैसे प्रमाणे विमा भरपाई पिकविमा कंपनीने दिली हे अतीशय क्लेशदायक व आपमानास्पद आहे. यासाठीचं या बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन केले आहे.शेतकऱ्याकडे लक्ष देण्याऐवजी राज्यातील मंत्री,आमदार,खासदार एकमेकांची उणीदुणी काढुन आरोप प्रत्यारोपाचं मोठं मनोरंजन सुरु आहे.काॅमेडीची बुलेट ट्रेन राज्यात सध्या धावत आहे.
सरकार सत्तेच्या धुंदीत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडं पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही.पिंपरी निर्मळ गावात ११० मिमी पाऊस झाला गावात सरसकट पंचनामे होणे अपेक्षित असताना याकडे सोईस्कर पणे प्रशासनाने दुर्लक्ष केले.मंत्री फक्त घोषणा करत असुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतआहेत. कृषीभुषण प्रभाताई घोगरे यांनी यावेळी येथील पांडुरंग नगर व अस्तगाव रोड वरि अतिवृष्टीग्रत मोहन निर्मळ या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट दिली.
ज्ञानेश्वर वर्पे यांनी प्रस्ताविक केले उत्तमराव घोरपडे,योगेश निर्मळ, अंबादास देसाई यांनी मनोगत व्यक्त करुन बिऱ्हाड मोर्चास पिंपरी गावाचा पाठिंबा व्यक्त केला.यावेळी जिजाबाई घोरपडे,मा.सरपंच बाबासाहेब घोरपडे, बाबासाहेब निर्मळ,सुभाष निर्मळ, राजेंद्र निर्मळ,सोन्याबापु निर्मळ, रामराव निर्मळ,दिलिप भुसाळ,लक्ष्मण राऊत,शंकर घोरपडे,बाळासाहेब पवार,बबन घोरपडे,मोहन,भानुदास निर्मळ,मोहन निर्मळ याच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट: मुख्यमंत्री म्हणतात हे सर्वसामान्यचं सरकार आहे आणि सरकार मधील कृषीमंत्री महिलांचे अर्वाच्च भाषेत बोलुन धिंडोडे काढतात ही भारतीय संस्कृतीला व मानवतेला काळीमा फासणारी बाब आहे याचा आम्ही निषेध करतो.
सौ.प्रभाताई जनार्दन घोगरे.
0 Comments