प्रवरानगर येथे विद्यार्थिनींसाठी आमची उर्मिला अंतर्गत करिअर गाईडंन्स फॉर गर्ल्स कार्यक्रम उत्साहात संपन्न!न्या.अदिती नागोरी मॅडम, अति. पोलीस अधीक्षक डॉ. स्वाती भोर व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती म्हस्के यांनी केले यावेळी मार्गदर्शन!

प्रवरानगर( प्रतिनिधी) छत्रपती एक्सप्रेस
राहता तालुक्यातील प्रवरानगर येथे बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र 90 .8 MHz के व्ही के प्रवरा कम्युनिटी रेडिओ केंद्र यांच्या विद्यमाने आमची उर्मिला कार्यक्रमांतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर व प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा कन्या विद्या मंदिर येथे नुकताच किशोरी मुली व तरुणींसाठी , विद्यार्थिनींसाठी,करिअर गाईंडन्स फॉर गर्ल्स हा 8 ते 12 वी. वर्गातील व किशोरी वयोगटातील विद्यार्थिनींसाठी विविध विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला राहता येथील दिवाणी तालुका न्यायाधीश न्यायमूर्ती अदिती नागोरी (राजवैद्य )मॅडम, श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वाती भोर तसेच राहत्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती म्हस्के या प्रमुख मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा एज्युकेशनच्या संचालिका डॉक्टर लीलावती सरोदे, प्राचार्या भारती देशमुख, शैलेश देशमुख, संगणक प्रमुख कैलास लोंढे ,केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओचे व या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक गायत्री म्हस्के, संगीता मोरे, मीडियाचे यमन फुलाटे व प्रवरा कन्या विद्या मंदिर व प्रवरा इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक वृंद आणि या दोन्ही विद्यालयातील आठवी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या आमची उर्मिला कार्यक्रमात न्यायाधीश आदित्य नागोरी मॅडम यांनी उपस्थित किशोरी व विद्यार्थिनींना मुली व महिलांसाठी चा कायदा व सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी मुली, महिलांसाठी संरक्षणाविषयी असलेल्या कायद्यासंदर्भात माहिती दिली. पोक्सो कायद्याची माहिती ही यावेळी त्यांनी विशद केली .कोणत्याही गोष्टीला मुली, तरुणी, महिलांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोणतेही अनुचित घटना घडली तर ती माहिती दिली पाहिजे .ती माहिती व नाव हे गोपनीय ठेवले जाते. असे यावेळी न्या.नागोरी मॅडम यांनी सांगितले. तर श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वाती भोर यांनी घाबरू नका ,पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे या विषयावर बोलताना कुणीही महिला मुली तरुणींना त्रास दिला, किंवा तो दिला जातो. मात्र मुली तरुणी त्याबद्दल बोलत नाहीत. तेव्हा आपण हा विषय गुप्त न ठेवता आपण त्या संदर्भात बोलले पाहिजे तसेच सध्याच्या युगात मुली सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करतात .पोस्ट करतात. मात्र फोटो पोस्ट किंवा शेअर करताना विचार करूनच केले जावेत. कारण त्याचा गैरवापरही होऊ शकतो .असे त्यांनी यावेळी सांगितले. तर डॉक्टर स्वाती म्हस्के यांनी किशोरी अवस्था संधीची या विषयावर बोलताना आहारावर मार्गदर्शन केले. आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात विविध मार्गदर्शनही उपस्थित विद्यार्थिनींना डॉक्टर स्वाती मस्के यांनी यावेळी मुलींशी खुला संवाद साधला व त्यांच्या आरोग्य बद्दल चर्चा केली .मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला या दोन्ही हायस्कूलचे शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांनी, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. व आरोग्य विभागाच्या वतीने मुलींसाठी व महिलांसाठी आरोग्य विषयावर विशेष पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे