लोहगाव( प्रतिनिधी )बँक ऑफ महाराष्ट्र बाभळेश्वर शाखेचे नुकतेच नवीन जागेत स्थलांतर झाले असून या स्थलांतर कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधीक्षक शिर्डीचे संजय सातव यांच्या हस्ते या नवीन जागेत गेलेल्या बँकेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगरचे झोनल मॅनेजर भगवान सुरसे तसेच डेप्युटी झोनल मॅनेजर सागर नाईक हे उपस्थित होते.यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी बँक ऑफ महाराष्ट्र बाभळेश्वर च्या नवीन जागेत स्थलांतर झालेल्या या बँकेच्या सोयी सुविधा संदर्भात समाधान व्यक्त करत ग्राहकांना इथून अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळतील .अशी आशा व्यक्त केली व या बँकेला शुभेच्छा दिल्या.यावेळी वरिष्ठ प्रबंधक दिनेश देशपांडे,राहता तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के,राज्य उत्पादन शुल्क चे वरिष्ठ अधिकारी कोल्हे साहेब, दै.छत्रपती एक्सप्रेसचे मुख्य संपादक शरद तांबे .प्रमोद बेंद्रे, नाजीम शेखबँकेचा स्टाफ वर्ग उपशाखा अधिकारी नागेश शिरसाठ,कृषी अधिकारी पूजा ढगे, वरिष्ठ प्रबंधक सचिन कोरडे,उप प्रबंधक अभिषेक उदमलेनाना उपाध्याय, प्रवीण काळे, योगेश सर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले व कार्यक्रमाची सांगता आणि आभार बँक ऑफ महाराष्ट्र बाभळेश्वर चे शाखाधिकारी सौरभ तिवारी यांनी केले.
0 Comments