लोणी येथे प्रिन्स चौकात शिवशाही बस व शाळेच्या बसचा अपघात

लोणी (वार्ताहार) राहाता तालुक्याती लोणी येथे प्रिस चौकात शिवशाही बस व शाळेच्या बसचा अपघात दुर्दैवाने जीवित हानी टळली. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवशाही बस ही शिर्डी मार्गे पुण्याच्या दिशेने जात असताना लोणी येथे प्रिन्स चौकात शाळेच्या बसला जबरदस्त कट बसल्याने दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु जीवित हानी मात्र टळली त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा विश्वास टाकला 
सकाळच्या वेळी शाळा भरण्याचा वेळ असल्यामुळे  लोणी मार्गे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसेस धावतात त्यामुळे रस्त्यावर विद्यालयाच्या विद्यार्थीन  बरोबर शाळेच्या बस मोठ्या प्रमाणात धावतात प्रिन्स चौकात मोठ्या प्रमाणे स्पीड  ब्रेकर असतानाही  हा अपघात झाला जर स्पीड बेकर नसते तर मोठी जीवित हानी झाली असती असा अंदाज येथील अपघात बघणाऱ्यांनी घेतला आहे.   

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे