प्रवरानगर येथील पद्मभूषण डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के ,सौ. शालिनीताई विखे पा. व डॉ .खा. सुजय विखे पा. यांच्या उपस्थितीत संपन्न!

लोहगाव (प्रतिनिधी) देशातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या राहता तालुक्यातील प्रवरानगर येथे पद्मभूषण डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखानाचा ७४ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ नुकताच माजी मंत्री आणासाहेब म्हस्के पाटिल ,जि.प माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे पाटील,ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी ,कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे,प्रवरा भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्षा सौ गीता थेटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल राव लंघे, भाजपचे तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शांतीनाथ आहेर,मॅचिंद्र थेटे, आण्णासाहेब कडू,कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश ससाणे, कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांच्या सह सर्व संचालक ,अधिकारी व कामगार ,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे