मुरबाड दि.२(बाळासाहेब भालेराव) ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका हा सर्वात परमार्थिक तालुका समजला जात आहे. विशेषता या मुरबाड तालुक्यात प्रवचन, कीर्तन, आणि पारायण या प्रबोधन सेवेला विशेष महत्त्व दिले जात आहेत त्याच धर्तीवर मुरबाड तालुक्याचे लोकनेते माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या आशीर्वादाने युवा नेते तसेच भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली दर वर्षी तिरुपती बालाजी दर्शन सोहळा होत आसतो याच धरतीवर यंदाही ३१ ऑक्टोंबर २०२३ पासून मुरबाड शहरी व ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यातून हजारो भक्त भाविक यांनी तिरुपती बालाजी येथे उपस्थिती दर्शवली आहे.तसेच तिरुपती बालाजी दर्शनाची यात्रा सात दिवस मुक्कामी राहणार आहे.
ही सुंदर संकल्पना अमलात आणून दरवर्षी तिरुपती बालाजी दर्शनाला मुरबाड तालुक्यातून हजोरा भक्त भाविक दर्शनासाठी जातात त्यामुळे खऱ्या अर्थान तिरुपती बालाजीचे दर्शन होत आहे. या कामी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, ह.भ.प. रामभाऊ दळवी (आण्णा) उपजिल्हा प्रमुख प्रकाश पवार , धनाजी दळवी सर यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शनासाठी तसेच राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. व तसेच शेकडो पदाधिकारी,, तसेच हजोरा कार्यकर्त्यांनी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे.
0 Comments