लोहगाव येथे विखे पाटील परिवाराकडून शिधापत्रिकाधारकांना ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते पाच किलो मोफत साखरेचे वाटप!

लोहगाव (प्रतिनिधी) शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये विखे पाटील परिवाराकडून दीपावली निमित्त प्रत्येक शिधापत्रिका धारकाला पाच किलो साखर मोफत वाटप करण्यात येत असून राहता तालुक्यातील लोहगाव, येथेही आज गुरुवारी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना दिवाळीनिमित्त पाच किलो साखरेचे वाटप करण्यात आले.
दिवाळी दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना ही दिवाळी सर्व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची गोड व्हावी या उद्देशाने मतदारसंघ हा एक परिवार समजून विखे पाटील परिवाराकडून प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना पाच किलो साखर देण्यात येत आहे. आज गुरुवारी लोहगाव येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिधापत्रिकाधारकांना पाच किलो साखर देण्यात आली. व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व नागरिकांना यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मोठ्या संख्येने गावातील शिधापत्रिका धारक उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. दिवाळीनिमित्त पाच किलो साखर मिळाल्यानंतर शिधापत्रिकाधारकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे