मतदान हा मूलभूत अधिकार- प्राचार्य अंगद काकडे


लोहगाव (वार्ताहार) : देशाच्या शाश्वत आणि समतोल विकासासाठी मतदानाचा हक्क बजावणे, हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अंगद काकडे यांनी केले. 
     प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे प्राचार्य अंगद काकडे हे होते. सुरुवातीला माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान दिनाची शपथ देण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्या अलका आहेर, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे हे उपस्थित होते.  यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य काकडे यांनी सांगितले की, मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा जनतेचा आहे. संविधानाने दिलेला हा अधिकार बजावून लोकशाहीच्या बळकटीसाठी व संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध राहू या! या जनजागृती निमित्त माध्यमिक विद्यालयात अश्विनी सोहोनी तर कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. शरद दुधाट यांनी मतदान जनजागृतीचे महत्व विद्यार्थ्यांना  आपल्या मनोगतातून पटवून दिले. यावेळी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लोहगावपर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे