लोहगाव (वार्ताहार) : प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलात नुकताच 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुढील काही कालावधीत सेवानिवृत्त होणारे शिक्षक राजेंद्र कुमार क्षिरसागर व शिक्षिका शोभा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी छात्रसेनेचे प्रमुख दीपक धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली छात्रसैनिकांनी यशस्वी संचलन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालयाचे माजी विद्यार्थी शुभम घोगरे यांनी समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलेल्या ब्लॅंकेटचे प्रतिनिधिकरित्या प्राचार्य अंगद काकडे, प्राचार्य नानासाहेब शेळके, शुभम घोगरे आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्राचार्य अंगद काकडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शुभसंदेशातून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्या अलका आहेर, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे यांच्या शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, अश्विनी सोहोनी, रेणुका वरपे व एस.ए. उगले यांनी केले.
0 Comments