शेती महामंडळातील आजी माजी कामगारांना दोन गुंठे राहण्यास जागा द्यावी. त्याचप्रमाणे कामगारांच्या देय असलेल्या रकमा देण्यात याव्यात. चौथ्या व पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी.आदी विविध मागण्यांसाठी व कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि. 11 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कायम कामगार, सेवानिवृत्त कामगार, राजीनामा दिलेले कामगार, रोजंदरीकामगार व मयत कामगारांचे वारस यांचा शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येणार असून या मोर्चात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लढा कृती समिती चे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी सावळीविहीर येथील शेती महामंडळ लक्ष्मीवाडी मळ्यावरील कामगारांच्या जाहीर मेळाव्यात केले.
राहता तालुक्यातील लक्ष्मीवाडी शेती महामंडळ मळ्यावरील आजी माजी कामगारांचा जाहीर मेळावा सुभाष कुलकर्णी ,भिकन पोपट शिंदे, मनोहर शिंदे , विनोनाथ बोळीज यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच लक्ष्मीवाडी शेती महामंडळाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या पटांगणात संपन्न झाला .यावेळी ते बोलत होते.
सुभाष कुलकर्णी यांनी मेळाव्या पुढे बोलताना सांगितले की ,अनेक सरकार आले व गेले मात्र शेती मंडळाच्या कामगारांचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. दोन गुंठे जागा व पाच एकर जमीन देण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्यामुळेच खंडकरांना जमिनी देण्याचा मार्ग सुखकर झाला .मात्र कामगारांचा प्रश्न तसाच टांगणीवर राहिला. शेती महामंडळाच्या जमिनी एकीकडे विनामूल्य दिल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे शेती महामंडळाचे आजी-माजी कामगारांच्या देय असलेल्या रकमा दिल्या जात नाहीत. संयुक्त शेतीला दहा वर्षांपूर्वी जमिनी दिल्या गेल्या. त्यामुळे सहा हजार रोजंदारी कामगार बेकार झाले. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगारांना ठरल्याप्रमाणे दोन गुंठे जागा राहण्यासाठी मिळावी. व कामगारांच्या देय रकमा दिल्या जाव्यात . आदी विविध मागण्यासाठी व कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सरकारचे लक्ष वेधावे, म्हणून 11 मार्च 2024 रोजी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे आठ शेती महामंडळ मळ्यातील शेती महामंडळाचे आजी माजी कायम कामगार, सेवानिवृत्त कामगार, राजीनामा दिलेले कामगार, रोजदांरी कामगार व मयत कामगारांचे वारस यांचा मोर्चा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लढा कृती समिती यांच्यावतीने काढण्यात येणार आहे .या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शिंदे यांनीही मेळाव्याला मार्गदर्शन केले. सध्या शेती महामंडळाच्या वाड्या ,कार्यालयेही मोडकळीस आले आहेत. मात्र आतापर्यंत कोणत्याही सरकारचे शेती महामंडळाच्या कामगारांकडे लक्ष नाही. आपण संघटनेमार्फत अनेक धरणे, आंदोलने ,मोर्चे, निवेदने देऊन लढा दिला. शेती महामंडळ चांगले सुरू होते. मात्र कोणत्याच सरकारला शेती महामंडळ सुरू राहावे असे वाटत नाही. असे दिसते. त्यामुळेच कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले. आभार विठ्ठलराव आगलावे यांनी मांनले.
या लक्ष्मीवाडीतील शेती महामंडळाच्या मेळाव्याला आजी माजी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यासाठी सुधाकर चव्हाण, प्रकाश ठाकरे, विठ्ठलराव आगलावे, संपत गुरसळ ,कारभारी धुमाळ ,संतोष अहिरे ,निवृत्ती पाळंदे, पोपट शेलार, पांडू जाधव, केशव गुरसळ ,पोपट पवार, कुसुम सुरळे, अशोक निकम, सुभाष शेलार ,बाळासाहेब कारभारी भडांगे ,लक्ष्मीबाई वसंत हुसळे, मीना साहेबराव जगताप, सुनंदा जितेंद्र चव्हाण ,शोभा नामदेव झोडगे ,कुंडलिक विठ्ठल पिंगळे आदींसह विविध पुरुष, महिला आजी माजी कायम रोजंदारी राजीनामा दिलेले कामगार व मयत कामगारांचे वारस आदी यावेळी उपस्थित होते.
0 Comments