कावेरी संसारेची शूटिंग हॉलीबॉल वर्ल्ड कपसाठी निवड



कोल्हार :- प्रा.साईप्रसाद कुंभकर्ण

लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या एफ. वाय. बी.ए या वर्गातील विद्यार्थिनी कु. कावेरी बाळासाहेब संसारे या विद्यार्थिनीची शूटिंग हॉलीबॉल वर्ल्ड कप साठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. 
हा वल्डकप नवी दिल्ली येथे होणार आहे. सदर वर्ल्डकप स्पर्धा यावर्षीपासूनच सुरू झालेली आहे. यामध्ये भारत ,पाकिस्तान ,बांगलादेश, नेपाळ, कॅनडा, न्यूझीलंड ,ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया ,अफगाणिस्तान यासारखे 19 देश सहभागी आहेत. या विद्यार्थिनीने यापूर्वी जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेमध्येही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या विद्यार्थिनीस क्रीडा शिक्षक डॉ. उत्तम राव अनाप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
कु.संसारे हिने यापूर्वी 41 वी जूनियर नॅशनल शूटिंग बॉल चॅम्पियन 2023 सवाई मानसिंग स्टेडियम ,जयपुर (राजस्थान) येथे सहभाग घेतला होता.
तसेच आतापर्यंत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला आहे. तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री.अण्णासाहेब म्हस्के पाटील, मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, 
सहसचिव श्री.भारत घोगरे, संस्थेचे डायरेक्टर एज्युकेशन तथा विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रदीप दिघे, महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने फिरता दवाखाना सुरू!