शिर्डी (प्रतिनिधी) उज्जैन येथे नुकत्याच झालेल्या एज्युकेशन आणि स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन नॅशनल गेम्स २०२३-२४ मध्ये
17 वर्ष वयोगटाखालील कबड्डी स्पर्धेमध्ये राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील सावकार क्रीडा मंडळाच्या तीन खेळाडूंनी
अभूतपूर्व यश मिळवून आपल्या संघाला प्रथम बक्षीस मिळवून दिले आहे. या संघामध्ये सावकार क्रीडा मंडळाच्या
रुद्र बोरावके,गुरुप्रसाद आरोटे,साईराज जगताप या तीन खेळाडूंनी मोठी कामगिरी केली.
व महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे मानकरी ठरवले.
या महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक कार्तिक पोटे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे या खेळाडूंनी ही कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.
सावकार क्रीडा मंडळ व गणेशनगर परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रशिक्षक कार्तिक पोटे यांचाही गणेशनगर येथे सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. या महाराष्ट्र कबड्डी संघाच्या सतरा वर्षे वयोगटाखालील खेळाडूंची आता पुढील नेपाळ किंवा दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी सतरा वर्षे वयोगटाखालील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील मुले खेळामध्ये मोठे प्रवीण असतात. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन ,सराव याची आवश्यकता असते. सावकार क्रीडा मंडळाच्या वतीने अशा खेळाडूंना गणेश नगर येथे मार्गदर्शन करून, सराव घेऊन चांगल्या प्रकारे तयार करण्याचे काम करत आहे. असे कार्तिक पोटे यांनी सांगितले.
0 Comments