राहता तालुक्यातील लोहगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड बसवण्यात आला असून त्यामुळे ही शाळा डिजिटल होण्यास मदत होणार आहे. नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नातून ही जिल्हा परिषद शाळा डिजीटल होण्यासाठी मोठा प्रयत्न होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री मा. नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या डिजिटल स्कूल संकल्पनेतून व विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना 2023- 24 अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव ता. राहता जि. अहमदनगर या शाळेत डिजिटल इंटरअॕक्टिव्ह पॅनलबोर्ड देण्यात आला आहे. यामुळे शाळा डिजिटल होण्यास मदत होईल .यामुळे मान. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानण्यात येत आहे. लोहगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते मान. बाबासाहेब चेचरे पाटील, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष मान. शांताराम पाटील चेचरे, सरपंच मान. शशिकांत पठारे पाटील उपसरपंच मान. दौलतराव चेचरे पाटील माजी उपसरपंच मान. सुरेश चेचरे पाटील अशोकराव चेचरे पाटील रावसाहेब चेचरे पाटील संजय चेचरे पाटील बाळासाहेब पाटील दरंदले शरद चेचरे पाटील बाबासाहेब वांगे दिलीप चेचरे पाटील., व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल दरंदले पाटील श्री शुभम चेचरे पाटील, गणेश गायकवाड पाटील,आर्यन सुरडकर शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थांनी ना.विखे पाटील यांचे आभार मानले आहे.
0 Comments