कोपरगाव लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिकचे उद्घाटन उत्साहात संपन्न!



कोपरगाव( प्रतिनिधी)
 लांयन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव संचलित, लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक चे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते लायन्स पार्क येथे नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले 
याप्रसंगी व्यासपीठावर लायन्सचे माजी प्रांतपाल श्रीकांत सोनी, सुधीरजी डागा , संगमनेर येथील  सुनीता पगडाल , कोपरगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड , अभिनंदन शिंगी, प्रसाद भास्कर, लिओ क्लबचे पृथ्वी शिंदे, धीरज कराचीवाला, जय बोरा , तसेच डेंटल क्लिनिक समिती सदस्य तुलसीदासजी खुबानी ,  सत्यन मुंदडा , राम थोरे डॉ.अभिजीत आचार्य ,राजेश  ठोळे व प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ.अंकित कृष्णानी उपस्थित होते.   
या लांयन्स डेंटल क्लिनिक मध्ये गोरगरिबांना अगदी नाममात्र दरात सेवा मिळणार आहे व या क्लिनिकमध्ये असणारी चेअर व सर्व यंत्रसामग्री अत्याधुनिक असणार आहे. अशी माहिती श्री रमेश शहा यांनी दिली 
या क्लिनिकमध्ये प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ अंकित कृष्णांनी रोज तीन तास सेवा देणार आहेत.
दातांची निगा कशी राखावी व दंत उपचाराबद्दल माहिती डॉ.अंकित कृष्णांनी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान दिली.
लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड यांनी प्रस्ताविक केले व लायन्स क्लबच्या सर्व सेवाभावी उपक्रमाची माहिती दिली
 डॉ.अंकित यांच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन सिंधी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 
रुग्णांना सवलतीच्या दरात मेडिसिन व इतर सेवा देण्याचा मानस आहे असे सत्यम मुंदडा यांनी सांगितले 
उपस्थित यांचे व सर्व मान्यवरांचे आभार डेंटल क्लिनिक समिती सदस्य सत्यम मुंदडा यांनी मांडले
 याप्रसंगी लायन्स , लिओ व लिनेस क्लबचे सर्व सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे