पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात दि.20 ते 24 फेब्रुवारी 2024 दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय शिबिराचे ( आधुनिक शेती आणि युवक) आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयात प्रथमच हे राज्यस्तरीय शिबीर होत आहे. शिबिरात राज्यभरातील अनेक महाविद्यालयांचा सहभाग राहणार असल्याची माहिती
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे,कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरात अनेक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.या पत्रकार परिषदेप्रसंगी उपप्राचार्य डॉ.भाऊसाहेब रणपिसे, डॉ.अनिल वाबळे ,डॉ.छाया गलांडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी डॉ.बी एफ मुंढे ,डॉ व्ही.ए. खर्डे , डॉ.श्रीमती लामखडे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे यांनी सांगितले की, शिबिराचे उद्घाटन मंगळवार ( 20 फेब्रुवारी 2024 ) सकाळी 10.30 माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,महात्मा फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. अभिजीत कुलकर्णी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सदानंद भोसले यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
24 फेब्रुवारी रोजी शिबिराचा समारोप होणार असून,राज्याचे महसूलमंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ यांची विशेष उपस्थिती असेल.
या शिबिराची तयारी पूर्ण झाली असून, मंगळवार दिनांक 20 /2/ 2024 रोजी डॉ. एस.एम.देशमुख यांचे आधुनिक शेतीमधून स्वयंम रोजगार, बुधवार दिनांक 21 /2/ 2024 रोजी डॉ ऋषिकेश औताडे यांचे मधुमक्षिका पालन व संगोपन गुरुवार दि. 22/ 2 /2024 रोजी डॉ शुभांगी साळोखे यांचे सौर ऊर्जा काळाची गरज, व डॉ महावीर सिंग चौहान यांचे आधुनिक शेतीमध्ये युवकांचे योगदान ,शुक्रवार दिनांक 23/ 2 /2024 रोजी डॉ.डी.एन बोरसे यांचे सेंद्रिय शेती काळाची गरज, व डॉ. योगेश थोरात यांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन, शनिवार दिनांक 24/ 2/ 2024 रोजी श्री सुभाष गडगे यांचे पॉलिहाऊस काळाची गरज, व महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.आर.ए.पवार यांचे ऊर्जा समस्या आणि उपाय या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहे .
0 Comments