मुरबाड दि.१७(बाळासाहेब भालेराव) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभेवर इंदिरा काँग्रेस मधून कोण उमेदवार दिला जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती परंतु ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरगे यांना भिवंडी लोकसभेवर उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यापासून त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच तलाकारापर्यंत काँग्रेस पोहोचण्याचा उत्तम काम केलं आहे.नुकताच लोणावळा येथे दोन दिवशी काँग्रेसच्या शिबिरात त्यांनी केलेल्या ग्रामीण भागातील कामाबाबत वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी घेतलेल्या ग्रामीण भागात कार्यक्रमाला त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने तसेच कोकणात सुद्धा काँग्रेसच्या शिबिरात त्यांनी राबवून वरिष्ठ नेत्यांची मनं जिंकली आहेत आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात जी मुस्लिम मते आहेत ती मते कोण घेणार व कोण काढू शकतो,, ती मते कोणाला मिळतील हा विचार केला जातो परंतु ती मते घेण्याचे काम फक्त भिवंडी ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे हेच मत घेऊ शकतात त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हालचालीला वेग आला आहे त्यामुळे निश्चितच भिवंडी लोकसभेवर दयानंद चोरगे यांना उमेदवारी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
0 Comments