राहता तालुक्यातील केव्हीके प्रवरा रेडिओ केंद्रावर सामाजिक न्याय व्यवस्था दिन उत्साहात संपन्न!




लोहगाव (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील केव्हीके प्रवरा कॅम्युनिटी रेडिओ केंद्रावर सामाजिक न्याय व्यवस्था दीना निमित्त विशेष कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
राहाता सामाजिक न्याय व्यवस्था या विषयावर रेडिओच्या गप्पा तुमच्या आमच्या !या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात राहता वकील संघांचे उपाध्यक्ष एडवोकेट डी के धनवटे यांनी रसिक श्रोत्यांना यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. रेडिओच्या हिंसा को नो या प्रोजेक्ट अंतर्गत कार्यक्रम अधिकारी गायत्री म्हस्के आणि तालुका विधी सेवा समिती राहता अंतर्गत माननीय वरिष्ठ न्यायाधीश अदिती नागोरी मॅडम, (राहता न्यायालय )यांच्या मार्गदर्शनाने  हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांना ऍड धनवटे सरानी सर्व शंका चे निरसन करत न्याय व्यवस्था आपल्या सोबत असण्याचा विश्वास दिला आणि सर्व श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आणि 3 मार्च रोजी होणाऱ्या लोक अदालती बदल मार्गदर्शन करत असताना कोणकोणती प्रकरणे लोक अदालतीत पूर्ण होतात. या बदल सविस्तर चर्चा झाली. ज्या प्रमाणे दुधातून लोणी काढण्या साठी प्रक्रिया करावी लागते. अगदी त्याच पद्धतीने कोर्टाची एक प्रक्रिया असते. कोर्ट कोणत्याही केस ला उगीच लांबवत नाही. असाही विश्वास त्यांनी श्रोत्यांना दिला. या कार्यक्रमात एकूण 7 रसिक श्रोत्यांनी फोन कॉल वर सहभागी होऊन आपले प्रश्न मांडले. या विषयी बोलताना ऍड धनवटे म्हणाले की, समाजातील घटकावर होणारा अन्यायाची त्यांनी स्पष्ट उक्ती करून प्रशासन, शासन आणि न्यायव्यवस्था यांच्यामार्फत घटनेने दिलेल्या हक्कांचा वापर करून व कर्तव्य पालनातून  समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कायद्याचा गैरवापर न करता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्यायव्यवस्थेची मदत घेतली पाहिजे तसेच सामंजस्याने आपल्यातील तंटे मिटवले पाहिजे. आणि यासाठी समाजाने व न्यायव्यवस्थेने एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. अशाप्रकारे राहता विधी सेवा समिती, केव्हीके प्रवरा रेडिओ यांनी एकत्र येऊन काम केले आणि सामाजिक न्याय व्यवस्थादिन हा  जनजागृती करत संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी केंद्राचे प्रमुख शैलेश देशमुख आणि कैलास लोंढे सरांचे विशेष सहकार्य मिळाले.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे