राहता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीला आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रदान!ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे होत आहे अभिनंदन!

लोहगाव (प्रतिनिधी) राहता तालुक्यातील
लोहगाव ग्रामपंचायतीला आर आर( आबा) पाटील सुंदर गाव  हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,  जि प च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, दक्षिण नगरचे  खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील,खासदार सदाशिव लोखंडे  ,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आला.हा पुरस्कार स्वीकारताना लोहगावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत पठारे, उपसरपंच दौलत चेचरेपाटील, ॲड.बाबासाहेब चेचरे पाटील ,विखे पाटील कारखाना माजी संचालक भाऊसाहेब पाटील चेचरे , माजी उपसरपंच सुरेश चेचरेपाटील, तंटा अध्यक्ष शांताराम चेचरे पाटील ,ग्रामपंचायत सदस्य  अशोक चेचरे पाटील,दीपक  सोनवणे, शरद चेचरे पाटील , बबलू वांगे, महेश कांबळे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्राम विकास अधिकारी अरुण सोनवणे हे उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

शेतकरी हतबल; नुकसानभरपाई व कर्जमाफीसाठी ठोस निर्णय हवा – प्रभावती घोगरे